Ad will apear here
Next
‘केरळीय गणितामध्ये माधवांचे बहुमोल योगदान’
आपटे बंधू स्मृती व्याख्यानात डॉ. विनायक सोलापूरकर यांचे प्रतिपादन
पुणे येथील मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित आपटे बंधू स्मृती व्याख्यानमालेच्या बोलताना गणित अभ्यासक व प्राध्यापक डॉ. विनायक सोलापूरकरपुणे : ‘भारतीय गणित शास्त्राला एक प्रदीर्घ आणि दैदिप्यमान परंपरा लाभली आहे. चौदाव्या शतकामध्ये केरळमध्ये माधवा हे महान गणिततज्ज्ञ होऊन गेले. त्यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे व संबंधित पुराव्यांमुळे आज आपल्याला गणितासारखा किचकट विषय सोप्या पद्धतीने समजू लागला आहे. गणित विषयामध्ये माधवांचे योगदान बहुमोल आहे,’ असे प्रतिपादन सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील गणित अभ्यासक व प्राध्यापक डॉ. विनायक सोलापूरकर यांनी केले.

‘माधवा व केरळीय गणित’ या विषयावरील पुस्तिकेचे प्रकाशन कारताना मान्यवर

पुणे येथील मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित केलेल्या आपटे बंधू स्मृती व्याख्यानमालेच्या ३५ व्या पुष्पात डॉ. सोलापूरकर बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेत ‘माधवा आणि केरळीय गणित’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. या वेळी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., गणिततज्ज्ञ रवी कुलकर्णी, कार्यवाह संजय मालती कमलाकर यांच्यासह विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी ‘माधवा व केरळीय गणित’ या विषयावरील पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.



डॉ. सोलापूरकर म्हणाले, ‘केरळीय पर्वामध्ये प्रामुख्याने सीमा, विकलन व संकलन या संकल्पनांचा अभ्यास झाला आहे. इ. स ४०० ते १२०० हा अतिशय महत्त्वपूर्ण कालखंड आहे. या कालखंडामध्ये पंच सिद्धांत हस्तलिखिते, महाभास्करीय ब्रह्मस्फुट, सिद्धांत, गणिती सारसंग्रह, बीजगणित, लीलावती अशा अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची निर्मिती झाली आहे. या कालखंडानंतर केरळीय गणित पर्वाचा झाला व यात माधवा, परमेश्वर, नीलकंठ व ज्येष्ठदेव यांसारखे गणित तज्ज्ञ होऊन गेले.’

रवी कुलकर्णी यांनीही या वेळी मनोगत व्यक्त करत गणितातील सूत्रे सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निश्चय म्हात्रे यांनी केले. विनय र. र. यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZMGBU
 There was a time when Ujjayini was the leader .
Aryabhatta is an example .


d
 Bhaskaracharya did not belong to the Keral school . Nor did the Jains
Region around Ujjaini produced a school of Mathematics . There is a
statue erected to honor Bhaskarachray , near Chalisgav . Was it
the Gupta period ?
Similar Posts
केरळीय गणितावर प्रा. सोलापूरकर यांचे व्याख्यान पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आयोजित आपटे बंधू स्मृती व्याख्यानमालेमध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील गणित अभ्यासक व प्राध्यापक डॉ. विनायक सोलापूरकर यांचे ‘माधवा आणि केरळीय गणित’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
वैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. रत्नदीप जोशी पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने २४ फेब्रुवारी २०१८ रोजी वैज्ञानिक कट्ट्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. डॉ. रत्नदीप जोशी या कट्ट्यावर येणार असून, ‘दैनंदिन जीवनात रासायनिक अभियांत्रिकीचा वापर’ या विषयावर ते संवाद साधणार आहेत
विज्ञानगप्पा पुणे : ‘बहिरेपणामुळे व्यक्तीच्या सामाजिक प्रगतीमध्ये अडथळे येतात. चांगले शिक्षण, नोकरी आणि आयुष्यातील इतर संधी त्यांच्यापासून दुरावतात. अनेकदा बहिरेपणाचा फायदा घेऊन, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होतात. वेळीच निदान आणि योग्य उपचार घेतले, तर तंत्रज्ञानाच्या साह्याने बहिरेपणाची तीव्रता कमी होऊ शकते,’ असे प्रतिपादन मुंबईतील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language